akola sakal
अकोला

Akola News : काटेपूर्णा प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा

सिंचनाला पाणी मिळण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

अकोला - गत काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठ्‍या बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्पातील पाणीसाठा ७५.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. याव्यतिरीक्त निर्गुणा, मोर्णा, उमा प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी परतीचा पाऊस होण्यापूर्वीच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने सिंचनाला पाणी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, परंतु आणखी पाऊस झाला नाही, तर सिंचनाला पाणी मिळेल अथवा नाही, याबाबत शंका आहे.

यंदा मान्सूनच्या पावसाने २५ आणि २६ जून रोजी सलग दोन दिवस जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावली होती. काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. २५ जून रोजी रात्री तेल्हारा, अकोट तालुक्यात पाऊस झाला. २६ जून रोजी अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळीसह पातूर तालुक्यात जवळपास अर्धा ते एक तास पाऊस झाला. परंतु हा पाऊस पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागली.

हवामान विभागाकडून वेळोवेळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. दरम्यान ७ व ८ जुलै नंतर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला व पेरणीला सुरुवात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात १७ जुलै पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतली व नंतर पुन्हा २१ जुलैपासून दोन-तीन दिवस जोरदार धुवाधार पाऊस झाला.

त्यामुळे जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाले व मध्यम प्रकल्पांमधून सुद्धा पाणी ओसंडून वाहू लागले होते. परंतु त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होऊ शकली नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठे सिंचना प्रकल्प काटेपूर्णा अद्याप शंभर टक्के भरले नाही. त्यामुळे सिंचनाला पाणी सोडण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाची तूट

गतवर्षी मान्सून वेळेवर आला व जुलै, ऑगस्ट मध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती. यंदा मात्र सप्टेंबर संपत आला असताना त्या तुलनेत पाऊस झाला नाही. परिणामी यंदा पावसाची ३० टक्के तूट आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत ६९३.७ पावसाची नोंद झाली. गतवर्षी आजच्या दिवशी ८७३.२ मिमी पाऊस झाला होता.

प्रकल्पातील पाणीसाठा

प्रकल्प पाणीसाठा (टक्के)

काटेपूर्णा ७५.५०

वान ९८.२२

मोर्णा ७९.१८

निर्गुणा १००

उमा १००

दगडपारवा ८६.५५

जून ते सप्टेंबर पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

अकोट ६७९.९

तेल्हारा ६६४.५

बाळापूर ६१४.२

पातूर ८०१.२

अकोला ७०३.४

बार्शीटाकळी ६९९.६

मूर्तिजापूर ७११.२

एकूण ६९३.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Order : बांगलादेशी महिलांना परत पाठविण्याचे न्यायालयाचे आदेश; सात महिलांचा समावेश; बुधवार पेठेमध्ये करत देहविक्रीचा व्यवसाय!

IND vs SA T20I: हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित, शुभमन गिलबाबत अनिश्चितता; कधी जाहीर होणार भारताचा ट्वेंटी-२० संघ?

Latest Marathi News Live Update : मतदानाची वेळ संपूनही मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा

Cosmetic Gynecology: कामा रुग्णालयात लवकरच ‘कॉस्मेटिक गायनेकोलॉजी’; देशात सरकारी रुग्णालयात प्रथमच विभाग सुरु होणार

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT