akola news Applications for RTE admission can be made till this evening 
अकोला

आरटीई प्रवेशासाठी आज संध्याकाळपर्यंतच करता येणार अर्ज

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्ह्यात प्रत्येक वर्षी आरटीई कायद्यान्वये खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये गरीब घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली असून पालकांना ३० मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दरम्यान आरटीई प्रवेशासाठी एक हजार ९६० जागा राखीव राहणार आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा आतापर्यंत चार हजार ३४४ पालकांना त्यांच्या पाल्‍यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे अनेकांना आरटीई प्रवेशापासून वंचित राहावे लागेल.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते,

परंतु आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. हा कायदा शाळांचा प्रवेश टप्पा जेथून सुरू होतो त्या पहिल्या वर्गापासून राबवला जाताे. दरम्यान आरटीई प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ४ हजार ३४४ पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची शेवटी संधी ३० मार्च पर्यंत असल्याने पालकांची अर्जासाठी लगबग वाढली आहे.
----------------
आधी २१ मार्चपर्यंत होती संधी
आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती. परंतु पालकांना ओटीपी मिळण्यास तांत्रिक खोडा निर्माण झाल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालक आता ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
-------------------
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
- नोंदणी केलेल्या शाळा - २०२
- आरक्षित जागा - १ हजार ९६०
- आतापर्यंत केलेले अर्ज - ४३४४

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT