akola news Competition for Katepurna Barrage Suprama; The villagers are indifferent 
अकोला

काटेपूर्णा बॕरेज सुप्रमा साठी श्रेयस्पर्धा ; ग्रामस्थ उदासीन

प्रा.अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील रखडलेल्या तीन बॕरेज प्रकल्पांपैकी एका प्रकल्पाची सुप्रमा (सुधारीत प्रशासकीय मान्यता) काल मंत्रालयात मंजूर होताच या मंजुरातीचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली असून ग्रामस्थ या स्पर्धेबाबत उदासीन आहेत.
         

पूर्णा नदीवरील घुगशी बॕरेज, काटेपूर्णा नदीवरील मंगरूळ कांबे जवळचा काटेपूर्णा बॕरेज व उमा नदीवरील रोहण्या जवळचा उमा बॕरेज हे तीन प्रकल्प गेली १५ वर्षे रखडली आहेत. २००७ मध्ये तत्कालिन आमदार प्रा.तुकाराम बिरकड यांनी आणलेले हे प्रकल्प त्यांची कारकीर्द संपल्यावर रखडले. घुंगशी बॕरेजचे काम बऱ्यापैकी झाले असून जलवाहिण्या टाकण्याचा शेवटचा टप्पा रखडला आहे.

काटेपूर्णा आणि उमा प्रकल्प तर प्रचंड रखडले आहेत. २३७ कोटीच्या ५ हजार ५१० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणणाऱ्या उमा आणि ५३३.८१ कोटीच्या ४ हजार १३७ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या सुप्रमा संबंधित जलसंपदा विभागाने मान्यतेसाठी पाठविल्या आहेत. त्यापैकी काटेपूर्णा प्रकल्पाची सुप्रमा काल मंजूर झाली आणि श्रेयाची दावेदारी सुरू झाली.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील या श्रेयस्पर्धेमुळे काटेपूर्णा बॕरेज प्रकल्प क्षेत्रातील ग्रामस्थ मात्र कमालीचे अस्वस्थ आहेत. काहीं प्रश्न आहे, 'बारा वर्षात आत्ताच कसा कळवळा आला?', तर काहींचा प्रश्न आहे, 'अगदी परवापर्यंत आपण, कुणी गाऱ्हाणे घेऊन आलेच नाही, असे सांगत उदासीन होतात आणि काल एकदम सुप्रमा घेऊन आलात ?'

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

SCROLL FOR NEXT