Akola News: Consolation to income tax payers, now applications can be filled till 31st December 
अकोला

आयकर दात्यांना दिलासा, आता ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे आयकर दात्यांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना आयकर न भरल्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भिती होती. ही भिती आयकर विभाग व शासनाने दूर केली आहे.

आता आयकर दात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर केल्यानंतर ३१ मार्च २०२१ पूर्वी आयकर भरणा करण्याची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय कर भरण्यासंदर्भातील वादग्रस्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘विवाद से विश्वास’ ही योजना थकीत करदात्यांसाठी आयकर विभागातर्फे राबविण्यात येत आहे.


अकोला येथील आयकर विभागाचे अप्पर आयुक्त यांनी आयकर दात्यांच्या माहितीसाठी नुकतेच एका ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले होते. आयकर विभागाच्या नागपूर झोनचे मुख्य आयकर आयुक्त राजेश रंजन प्रसाद यांनी यावेळी आयकर भरणा करण्यासंदर्भात माहिती दिली.

कोरोना संकट काळामुळे अनेकांना नियमित वेळेनुसार इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता आल्या नाहीत. त्यामुळे आयकर विभागाच्या नियमानुसार त्यांना दंड भरावा लागणार होता. यातून आता आयकर दात्यांना दिलासा देण्यात आला आहे.

त्यासाठी ‘विवाद से विश्वास’ ही योजना राबविली जात असून, त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत आयकर दात्यांना आयकर रिटर्न फाईल करता येणार आहे. त्यानंतर आयकराची रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत मिळणार आहे.

या काळात कोणतेही विलंब शुल्क आयकर दात्यांना आकारले जाणार नसल्याची माहिती आयुक्त प्रसाद यांनी दिली. या वेबिनारला अकोला आयकर विभागाचे अप्पर आयुक्त डी.बी. गोहिल आणि डब्ल्यूआयआरसी अकोला ब्रॅँचचे अध्यक्ष जलाल बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सीए महावीर अटल यांनी केले तर केयुर डेडिया यांनी आभार व्यक्त केले. डी.बी. गोहिल यांनी आयकरदात्यांना पुढे येऊन या योजनेचा लाभ घेत आयकर फाईल सादर करणे व १०० टक्के आयकराचा भरणा करण्याचे आवाहन यावेळी केले.

‘विवाद से विश्वास’ या योजनेतून आयकर, टीडीएस, टीसीएसबाबत काही वाद असल्यास ते सोडविण्यात येणार असून, १०० टक्के भरणा करणाऱ्यांना या योजनेतून दंडाची रक्कमेत सुट मिळणार असल्याची माहिती गोहिल यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT