Akola News: Earlier deadly attack with an ax; Then set on fire 
अकोला

भयानक: आधी कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला; नंतर पेटून केली हत्या, काय झाले असावे?

श्रीकृष्ण लखाडे, चतारी

चतारी (जि.अकोला)  : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ  कारणावरून आधी जीवघेणा हल्ला केला नंतर गावठी दारूने पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी 13 सप्टेंबर रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे.

राजाराम तुकाराम हिवराळे 55  असे मृतकाचे नाव आहे. आरोपी विकास बाबूसिंग राठोड,व मृतक राजाराम हिवराळे, हे दोघे जण एका शेत मालकाच्या शेतात मजुरी करीत होते.

रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून आरोपी विकास राठोड, यांनी राजाराम हिवराळे यांच्यावर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला, नंतर दारूने पेटवून दिल्यावर गंभीर अवस्थेमध्ये हिवराळे, याला  जवळील नाल्याच्या काठावर टाकून दिले सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनला मिळाली.

 प्रभारी ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात आदिनाथ गाठेकर, पद्माकर पातोंड, किरण गवई, रावसाहेब बुधवंत, सुधाकर करवते, खत्री, संतोष जाधव, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गंभीर झालेल्या राजाराम हिवराळे, याला अकोला येथे उपचारासाठी हलविले परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीस अटक केली आहे,

रात्री उशिरापर्यंत आरोपी विकास राठोड, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहे. विकास राठोड,हा गुंड पर्वतीच्या असून,त्यांनी अनेक जणांना मारहाण जीवघेणा हल्ला असे कृत्य केले आहे. त्याच्या विरुद्ध  चान्नी पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याप्रकरणी पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT