Akola News: Election for 225 Gram Panchayats in Akola district will start from 23rd 
अकोला

उमेदवारी अर्ज भरण्यास २३ पासून सुरूवात, अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारीरोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत बुधवार (ता. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुक ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील.

शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे बुधवार पासूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे.


राज्यासह जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.

त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. दरम्यान आता डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे ४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सदर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया - २३ ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत
- उमेदवारी अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर २०२०
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी - ४ जानेवारी २०२१ पर्यंत
- निवडणूक चिन्ह वाटप - ४ जानेवारी २०२१ (दुपारनंतर)
- मतदान - १५ जानेवारी २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
- मतमोजणी १८ जानेवारी २०२१

या ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक
तालुका ग्रा.पं. संख्या
तेल्हारा ३४
अकोट ३८
मूर्तिजापूर २९
अकोला ३६
बाळापूर ३८
बार्शीटाकळी २७
पातूर २३
----------------------
एकूण २२५

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT