promise of Bachchu Kadu, waiting for the memorial, justice has not been served for fourteen years 
अकोला

बच्चू कडूंच्या आश्वासनानंतरही स्मारक प्रतीक्षेतच, चौदा वर्षांपासून मिळाला नाही न्याय

सिद्धार्थ वाहुरवाघ

अकोला : गत १४ वर्षाआधी देशाच्या सेवेत जम्मू काश्‍मीर द्राक्स सेक्टर ऑपरेशन रक्षक अंतर्गत बर्फाच्या पावसात ता.२३ मार्च २००७ साली विर मरण आलेल्या भारतीय सैन्यातील शिवणी येथील रहिवासी शहीद प्रशांत राऊत यांचे ‘शहीद स्मारक’ शिवणीत कधी बनणार याची अजून शिवणीवासियांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

ज्याठिकाणी त्यांच्या स्मारकाची जागी दिली आहे. त्याठिकाणी निव्वळ फकलबाजी करून अनेक समस्यांनी व्याखूळले आहे. याकडे संबंधित विभागाचे गाळ झोपेत असल्याने ‘स्मारक’ बांधण्याचा त्यांना विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.


समुद्रसपाटीपासून २० हजार फूट उंचीवर असणाऱ्या कारगिल शिखरावर प्रशांत राऊत तैनात होते. त्याचवेळी बर्फाचा पाऊस झाल्याने बर्फाखाली दबल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यावेळीच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने स्मारक समिती स्थापन करून शिवणी-कुंभारी रोड वरील औद्योगीत क्षेत्राच्या मालची जागा ‘स्मारका’साठी दिली. परंतु, शासनाकडून कुठलाही पाठवुरावा न करता १४ स्मृती दिनीही स्मारक बनलेच नाही. याठिकाणी मच्छी मार्केट, ऑटो स्थानक, गॅरेज बनवून शहीद फलकाची विटंबना होत असल्याचे दिसून येत आहे.

याकडे तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासन आणि आताची मनपा प्रशानाला स्मारकाचा विसर पडला आहे. ज्यावेळी राऊत शहीद झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यासाठी शिवणी गावाची स्मशानभूमी देखील नव्हती. त्यावेळी येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने राऊत यांच्या अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळाली, त्याबरोबर कायमस्वरूपी शिवणी वासियांना स्मशानभूमी मिळाली. आजही शहीद प्रशांत राऊत यांचे स्मारक व्हावे या प्रतीक्षेत त्यांचे कुटुंबीय आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देऊन शहरात मोठे स्मारक उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, अजून त्यावर काहीच हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. लोकप्रतिनिधीही याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहेत. शहीद स्मारकासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्‍न राऊत यांच्या कुटुंबियासह शिवणी वासियांना पडला आहे.

रस्ता रुंदीकरणाचा बसेल फटका
तत्कालीन ग्रामपंचायत व औद्योगिक क्षेत्राने त्यांच्या मालकीच्या जागेवर स्मारक बनविण्यासाठी जागा दिली होती. परंतु, कुठलेही कागदोपत्री न देताच त्यावर स्मारकाचे काही प्रमाणात बांधकाम झाले आहे. शिवणी-कुंभारी, शहीद प्रशांत राऊत चौक ते शिवणी-शिवापूर रेल्वे स्टेशन रोडच्या जागेचे रुंदीकरण जेव्हा होणार त्यावेळी हेच बांधकाम मधात येणार आहे. त्यावेळी अर्धवट असलेले बांधकाम तोडण्याचा निर्णय देखील अधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे.
 
लोकप्रतिनिधीही उदासीन
आपण ज्या ठिकाणी प्रतिनिधीत्व करतो त्याठिकाणचा सैनिक शहीद झाला. अशा शहीद जवानाचे शहरात स्मारक व्हावे या उद्देशाने स्थानिकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसून येते. गत १४ वर्षात अनेक खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्याक्ष, इतरांनी राऊत कुटुंबाला फक्त आश्‍वासनच दिले आहे. परंतु, कोणीही पुढाकार घेऊन स्मारक बनविण्यास प्रशासनाचे उंबरठे झिजविले नाही.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT