akola news Eventually the mind woke up, sprayed with sodium hypochloride to get rid of mosquitoes 
अकोला

अखेर मनपाला आली जाग, डासांपासून मुक्तीसाठी सोडियम हाईपोक्लोराईडची फवारणी

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : बदलेल्या हवामानामुळे व स्वच्छतेच्या अभावी शहरातील नदी काठाच्या परिसरासोबतच इतर परिसरातही डासांचा प्रार्दुभाव मोठ्याप्रमाणात वाढला होता. याबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून, शहराच्या विविध भागात सोडियम हाईपोक्लोराईची फवारणी करण्यास सुरुवात झालली आहे.
केवळ नदीकाठचा परिसरच नव्हे तर शहराच्या विविध भागात महापालिकेने सोडीयम हाईपो क्लोराईडच्या फवारणीस प्रारंभ केला आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले, त्या भागात सेपीया-२०० या औषधाची फवारणी केली जात आहे. शहरात डासांचा प्रार्दुभाव वाढल्याने यावर त्वरित उपाय योजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक गिरीश जोशी यांनी प्रशासनाकडे काही दिवसांपूर्वीच एका निवेदनातून केली होती. मोर्णा नदीत दोन्ही बाजूने शहरातील सांडपाणी सोडले जाते. नदीत साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. परिणामी गुलजारपूरा, तपे हनुमान परिसर, मोहता मिल परिसर, दगडीपूल, सावतराम चाळ, काळा मारोती परिसर, जयहिंद चौक, किल्ला परिसर, हरिहर पेठ, रमाबाई आंबेडकर नगर, बलोदे ले-आऊट, हिंगणा परिसर, अनिकट, कमला नेहरु नगर, खोलेश्वर, रजपुतपुरा, रिगल टॉकीज, राम नगर परिसरासह नदीकाठच्या सर्वच भागांना डासांच्या प्रार्दुभावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखादवेळी तापाची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असताना डासांमुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या उद्रेकाची वाट न पाहाता, नदीकाठ परिसरासह शहराच्या सर्वच भागात फवारणी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT