akola news Gharkul beneficiaries built the walls, but what about the roof? 
अकोला

घरकुल लाभार्थ्यांनी भिंती बांधल्या, पण छताचे काय ?

सकाळ वृत्तसेेवा

वाडेगाव (जि. अकोला)  ः प्रत्येकाला स्वतःचे घर असावे यासाठी शासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना आमलात आणली. मात्र, सध्या वाढलेली महागाई पाहता घराच्या स्वप्नाला कुठेतरी तडा जाताना दिसत आहे. घरकुल बांधकामासाठी दिल्या जाणारे अनुदान तुटपुंजे असल्याचे घरकुल लाभार्थ्यांचे म्हणने असल्याने शासनाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे अनुदान वाढवून देण्याची मागणी होत आहे.


शासनाकडून ग्रामीण भागात पंचायत समिती स्तरावरून दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या, तसेच एक लाख रूपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना आदिवासी विकास प्रकल्प विभागा अंतर्गत शबरी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते.

मात्र, अलीकडच्या काळात बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, सिमेंट, मजुरांची मजुरी यांच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान आणि त्यात वेळेवर अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने घर कसे बांधावे? असा मोठा प्रश्‍न लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. वाडेगावसह परिसरात अनेक घरकुलाचे बांधकाम रखडले असल्याने भिंती बांधल्या मात्र छताचे काय? असा प्रश्‍न लाभार्थी उपस्थित करीत असल्याने सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे.

अनेक लाभार्थ्याचे घरकुले पूर्ण न झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाने घरकुलाच्या निधीत भरीव वाढ करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांकडून केल्या जात आहे.
--------------------------
शासनाकडून घरकुल बाधण्याकरिता विविध योजनेतून १ लाख २० हजार रूपयांचे अनुदान दिल्या जाते. मात्र, सध्याची वाढलेली महागाई पाहता मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानात घर बांधणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे.
-ॲड. सुबोध डोंगरे, स्थानिक रहिवासी.
--------------------------
अलीकडच्या काळात विटा, सिमेंट, रेती आदी बांधकाम साहित्यात झालेली वाढ आणि मजुरांची मजुरी सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्य बाहेर आहे. त्यामुळे शासनाने विविध घरकुल योजनाच्या अनुदानात वाढ करून द्यावी. जनेकरून घरकुलाचे बांधकाम करता येईल.
-अय्याज साहील, स्थानिक रहिवासी.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ११ लाख नाही फक्त एक लाख दुबार मतदार, मुंबईत मतदारांची छाननी; पालिकेचे तंत्रज्ञानाधारित मॉडेल यशस्वी

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट–मनसे युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम

Nandgaon News : मिरची तोडल्याच्या आरोपावरून नांदगावच्या मजुरांवर जीवघेणा हल्ला; महिलांवर अत्याचाराचाही प्रयत्न

Ashes : इंग्लंडने अखेर लाज वाचवली, चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी जिंकली; ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव अन् WTC Point Table बदलले

Gajkesari Yog Lucky Rashi 2026: नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब पलटणार, 'गजकेसरी राजयोग' देणार मोठं यश

SCROLL FOR NEXT