Akola News: A huge fire broke out in the godown of a spinning mill 
अकोला

सूतगिरणीच्या गोडावूनला भीषण आग

सकाळ वृत्तसेेवा

चिखली (जि. बुलडाणा)  : श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूत गिरणीच्या सुताच्या गोडाऊनला मंगळवारी रात्रीदरम्यान लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे ७ ते ८ कोटी रूपयाचा सूत व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीवर १४ तासानंतर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात यश आले.


साकेगाव रोडवरील अनुराधा नगरस्थित मुंगसाजी महाराज सहकारी सूत गिरणीच्या सुताच्या गोडाऊनला रात्री १२ ते 3 दरम्यान आग लागल्याचे लक्षात आले. याबाबत गिरणीच्या संचालकांना माहिती मिळताच सर्वांनी सूतगिरणीकडे धाव घेतली. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. गोडाऊनमध्ये सूत अधिक प्रमाणात असल्या आगीने लगचेच रौद्र रूप धारण करून संपूर्ण गोडाऊनला आगीने कवेत घेतले.

यामध्ये सुमारे दिड कोटींचा सूत, सुमारे साडेतीन कोटीच्या दोन सूत जोणाऱ्या ऑक्टो कोलर मशीन जळून खाक झाले आहे. आगीची तीव्र झळ इमारतीलासुद्धा बसली असून, स्लॅब क्रॅक झालेला आहे. ता.३ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजेच्या सुमारास लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले.

गोडाऊनमध्ये सुताचे बंडल असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले होते. सुमारे १४ तासांनतर ४ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली असली तरी यात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पंचनाम्याअंती नुकसानीचा निश्चित आकडा व आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT