Akola News: Husband and wife die after falling into well 
अकोला

सोयाबीन सोंगण्याकरिता गेलेल्या पती-पत्नीचा विहिरीत पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा

चिखली (जि.बुलडाणा) : तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवाशी असलेल्या राखोंडे दाम्प्त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ता.१ रोजी दुपारी १ ते २ वाजेदरम्यान घडली.
याबाबत सविस्तर असे की, सोनेवाडी येथील रहिवाशी संजय राजाराम राखोंडे यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शांताराम देविदास राखोंडे (२२), आरती शांताराम राखोडे (१९) हे दोघे पती-पत्नी येवता येथील शिवारातील विष्णू बंगाळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन सोंगण्याकरिता गेले होते.

दुपारच्यावेळेस जेवण करीत असतांना विहिरीवर पाणी आणण्याकरिता गेलेली पत्नी आरती लवकर न आल्यामुळे विहिरीवर अचानक पाय घसरून पडलेली दिसताच पती शांताराम याने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लॉकडाउनमध्ये दोघांचा विवाह झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय शिंदे करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT