Akola News: Immunity Booster fortnight from today, District Collectors instructions 
अकोला

आजपासून इम्युनिटी बुस्टर पंधरवडा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विवेक मेतकर

अकोला:  नागरिकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवून जीवघेण्या कोरोना आजाराचा मुकाबला करणे शक्य होणार आहे. याकरिता स्वतः जिल्हधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. अकोला जिल्ह्यात  शुक्रवार (२ ऑक्टोबरपासून) इम्युनिटी बुस्टर पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संबंधीच्या घडीपत्रिकेचे वितरण घरोघरी केले जाणार आहे.

ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मुख्यमंत्री यांची मोहीम असून, या मोहिमेत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी सहभाग घेवून संदिग्ध रुग्ण व कोमाब्रीड रुग्णांची १०० टक्के तपासणी होईल, यासाठी लक्ष घालावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती १०० टक्के अॅपव्दारे ऑनलाईन भरावी, अशा सूचना त्यांनी दिल्यात.

होमक्वॉरंटाईन रुग्ण बाहेर फिरताना आढळल्याच्या तक्रारी येत आहे. यासाठी अशा रुग्णांवर लक्ष ठेवावे. बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मृत्यू पावलेल्या कुटूंबातील व्यक्तींची आणि आजूबाजूच्या कुटुंबांची कोरोना तपासणी करुन घ्यावी. अंत्यविधीस येणाऱ्यांचा डाटा ठेवावा. शहराजवळील गावात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तेथे कोरोना तपासणी शिबीर घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT