Akola News: It will rain from Sunday, do crop planning to avoid damage 
अकोला

रविवारपासून पाऊस झोडपणार, नुकसान टाळण्यासाठी करा पिकांचे नियोजन

मनोज भिवगडे

अकोला ः हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार विदर्भात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीन, खरीप ज्वारी व कापसाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


सध्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक कापणी सुरू आहे. बऱ्याच शेतावर कापणी करून सुखवणी करिता छोटे ढीग केलेले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले पीक योग्य ठिकाणी जमा करून मळणी करून घ्यावी, पिकाचे पावसापासून होणारे नुकसान टाळावे.

ज्या शेतकऱ्यांना मळणी करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी जमा केलेल्या सोयाबीनची सुडी उंचवट्याच्या ठिकाणी लावून व्यवस्थित ताडपत्रीने झाकून घ्यावी, जेणेकरून सुडीमध्ये पावसाचे पाणी जावून नुकसान होणार नाहीत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT