Akola News: Last chance for RTE admission, deadline is November 23 
अकोला

आरटीई प्रवेशाची शेवटची संधी, मुदत 23 नोव्हेंबरपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

अकोला: आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापुर्वी सदर मुदत २९ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. परंतु आरटीई कोट्‍यातील जागा रिक्तच असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.


यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती.


अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत.


दरम्यान यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेशासाठी संधी देण्यात आली. त्यानंतर सुद्धा अद्याप आरटीई कोट्‍यातील जागा रिक्तच आहेत.
अशी आहे

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची स्थिती
- आरटीईसाठी नोंदणी करणाऱ्या शाळा - २०१
- एकूण जागा - २३२३
- प्रतीक्षा यादीतील निवड - ६७०
- तात्पुरते प्रवेश - १३६
- निश्चित प्रवेश - २५३

(संपादन - विवेक मेतकर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR इफेक्ट! पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, निवडणूक आयोगाने यादी केली प्रसिद्ध

IPL मुळे माझं आंतरराष्ट्रीय करियर उद्ध्वस्त झालं..., केवीन पीटरसनचा खळबळजनक दावा; इंग्लंड क्रिकेटवरही आरोप

Shaktipeeth Highway Route Change : 'शक्तिपीठ' महामार्गाचा मार्ग बदलला; माण–खटावमधून जाणार, शिखर शिंगणापूर-गोंदवलेही जोडले जाणार

Latest Marathi News Live Update : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

SCROLL FOR NEXT