akola news Manpat help room for bed availability for Kovid patients 
अकोला

कोविड रुग्णांकरिता बेड उपलब्‍धतेसाठी मनपात मदत कक्ष

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अकोला शहरामध्‍ये कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता त्‍यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे बेडची उपलब्‍धतेबाबत माहिती देण्‍यासाठी अकोला महानगरपालिका कार्यालय येथे २४ तास माहिती कक्ष (कोविड-१९ हेल्‍पलाईन कक्ष) आणि टोल फ्री क्रमांक कार्यान्‍वित करण्‍यात आले आहे.


अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांना शहरामधील कोरोना केअर सेंटर येथील बेड उपलब्‍धतेबाबतची माहिती घेणे सोईचे व्‍हावे याकरिता मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये टोल फ्री क्रमांक 18002335733 आणि टेलीफोन क्रं. 0724-2434412 कार्यान्‍वित करण्‍यात आला आहे.

अकोला शहरातील नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे की, पॉझिटिव्‍ह आलेल्‍या रुग्‍णांना कोविड केअर सेंटरमधील बेड उपलब्‍धतेबाबतची माहिती घ्‍यावयाची असल्‍यास त्‍यांनी २४ तास सुरू असलेल्‍या कोविड माहिती कक्षातील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याचसोबत अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी, मनपा क्षेत्रामध्‍ये कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण कुठेही मुक्‍त संचार करताना आढळल्‍यास मनपाच्‍या संबंधीत झोनमध्‍ये किंवा क्षेत्रीय अधिकारी यांच्‍याशी संपर्क साधावा किंवा मनपातील टोल फ्री क्रमांकावर माहिती देउन शहरात होत असलेल्‍या कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे मनपा आयुक्‍त यांच्‍या व्‍दारे आवाहन करण्‍यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नांव गुपीत ठेवण्‍यात येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT