Akola News 
अकोला

Akola News : रिक्त पदे, डॉक्टरांच्या बदलीमुळे नेत्ररोग विभाग अडचणीत! विद्यार्थ्यांची गैरसोय

सकाळ डिजिटल टीम

अकोला : स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) कार्यरत एकमात्र नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. भावेश गुरुदासाणी यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे जीएमसीमधील नेत्ररोग विभागातील तपासण्या, शस्त्रक्रिया रखडणार असून एमबीबीएससह एमडी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यातील रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्या व विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी सन् २००२ मध्ये अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी संलग्न आहे.

सुरुवातीला रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सुविधांसह विद्यार्थ्यांना एमबीबीएसचे शिक्षण देण्यात आले. परंतु त्यानंतर शासनाने जीएमसीचे श्रेणीवर्धन करत या ठिकाणी स्नातकोत्तर अर्थात एमडीचे अभ्यासक्रम सुद्धा सुरू केले. त्यामुळे सध्या जीएमसीमध्ये जवळपास २२ विविध शाखांमधील विद्यार्थी एमडीचे शिक्षण घेत आहेत.

मनुष्यबळाच्या अभावामुळे जीएमसीमध्ये नेहमीच रुग्णसेवे संदर्भात तक्रारी होत असतात. परंतु त्यानंतर सुद्धा जीएमसी प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यास कधीही कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे रुग्णालयावर गोरगरिबांचा अधिक विश्वास वाढत आहे.

दरम्यान रुग्णालयातील नेत्ररोग विभागाने सुद्धा चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या विभागात गत काही दिवसांपासून डोळ्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होत आहेत. हा विभाग सुद्धा अल्प मनुष्यबळाच्या समस्येने त्रस्त असतानाच या विभागात कार्यरत एकमात्र नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गुरुदासाणी यांची शासनाने नागपूर येथे बदली केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुगणेसेवेसह विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

शस्त्रक्रियांवर होणार परिणाम

डॉ. गुरुदासाणी बदलीवर नागपूर येथे गेल्यास जीएमसीच्या नेत्ररोग विभागातील शस्त्रक्रियांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. सध्या या विभागात नेत्र प्रत्यारोपणाचे काम सुरु असून त्यातून अनेकांना दृष्टी मिळाल्याचे बोलल्या जात आहे. परंतु डॉ. गुरुदासाणी यांच्या बदलीनंतर नेत्र प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.

परीक्षेच्या तोंडावर बदलीने शैक्षणिक नुकसान

जीएमसीच्या नेत्ररोग विभागात एक प्रोफेसर, दोन असोसिएट प्रोफेसर व दोन नियमित असिस्टंट प्रोफेसरची पदे रिक्त असून एकमात्र असिस्टंट प्रोफेसर डॉ. दुरुदासाणी कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त एक कंत्राटी असिस्टंट प्रोफेसर आहेत. हे शिक्षक रुग्णसेवेसह एमडी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा ही १२ जुलैपासून होणार असल्याने शिक्षकच राहणार नसल्याचे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नेत्ररोग विभागात एमडी अभ्यासक्रमाचे एकूण १२ विद्यार्थी असून त्यांना सुद्धा चिंता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT