Akola News: Policeman dies due to corona 
अकोला

पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

सुगत खाडे

अकोला : राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अकोल्यातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचे संकट गडद होत असून, केवळ अकोलेकरांच्या निष्काळजीमुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही धोक्याचे सावट आहे.

आर.पी.टी.एस.अकोला येथे कार्यरत पोलिस हेडकाँस्टेबल राजू नथ्थूजी खेडकर यांचे कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे सोमवारी (ता.२१) निधन झाले. त्यांच्यावर १३ सप्टेंबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार सुरू होते.


राजू खेडकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतरी त्यांना जीएमसीमध्ये ता. १३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आईसीयूमध्ये उपचार केले जात होते. सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली. राजू खेडकर यांना एक मुलगा आहे. त्यांनी पीटीएस, सिटी कोतवाली, पोलिस मुख्यालय काम केले आहे.

 विनाकारण रस्त्यावर फिरणारे हे कोरोनाचे वाहक ठरू शकतात. पर्यायाने पोलिसांनाही कोरोनाचा धोका निर्माण करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT