akola news RTE: Four thousand applications for two thousand seats 
अकोला

RTE :दोन हजार जागांसाठी पावणे चार हजार अर्ज

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (अारटीई) शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत मंगळवर, ता.३० मार्च रोजी संपली. या मुदतीत जिल्ह्यातील एकूण २०२ शाळांसाठी असलेल्या एक हजार ९६० जागांसाठी चार हजार ७२७ अर्ज पालकांनी भरले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता छानणी व साेडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. हा कायदा शाळांचा प्रवेश टप्पा जेथून सुरू होतो त्या पहिल्या वर्गापासून राबवला जाताे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ता. ३० मार्चपर्यंत होती. या मुदतीत पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

आरटीई अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ता. ३ मार्चपासून सुरू झाली होती. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती. याच काळात पालकांना ओटीपी मिळण्यास तांत्रिक खोडा निर्माण झाल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीनुसार ता. ३० मार्चपर्यंत पालकांना अर्ज करता आलेत. त्यामुळे अर्जांची संख्या वाढली आहे.
.............................
अकोला जिल्ह्यातील स्थिती
- नोंदणी केलेल्या शाळा - २०२
- आरक्षित जागा - १ हजार ९६०
- अर्ज - ४ हजार ७२७

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT