Akola News: Scenes of action begin, how to falsify on Diwali? How are you doing at other times? 
अकोला

ऐन दिवाळीतच भेसळ कशी? इतर वेळी सारे सुरळीत कसे?

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः वर्षभर इतर वेळी जणू काही भेसळ होतच नाही आणि दिवाळी आली की भेसळ करण्याचा गोरखधंदा सुरू होतो, असा अर्विभावात या कारवाया केल्या जात असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न चिन्ही उपस्थित केले जात आहे.


दिवाळीची चाहूल लागतात अन्न व औषध प्रशासन विभाग खळबळून जागा होतो. अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी या विभागाच्या कारवाया सुरू होतात. अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी जठरपेठ स्थित केला प्लॉट येथील एका दुकानात वैभव गणेश मोडक यांच्या घरी भेसळ युक्त खाद्यपदार्थांचा माल असल्याच्या माहितीवरून कारवाई केली.

या कारवाईत खाद्य पदार्थाच्या पाकिटांवर कुठलेही लेबल नसल्याने तसेच या मालाचे खरेदी बिल नसल्याने व त्यावर बेस्ट बिफोर तारखेचा उल्लेख नसल्याने ती कमी दर्जाच्या असल्याचे दर्शवून कारवाई केली. ही तत्परता मात्र या विभागाकडून वर्षभर दाखविली जात नाही.


वर्षभर नियमित तपासणीच नाही
दिवाळी सण आला की व्यावसायिकांना वेठीस धरून सुरू होणाऱ्या कारवाईत गुंतलेले अधिकारी वर्षभर त्यांच्या कर्तव्याची आठवण ठेवत नाही. अधिकाऱ्यांकडून कोणते हितसंबध वर्षभर जोपासले जातात त्यामुळे कुठेही नियमित तपासणी होत नाही. ना हॉटेल, ना किराणा दुकानांमधील खाद्य पदार्थांची तपासणी. नियमित तपासणी होत नसल्याने भेसळ करणाऱ्यांचे फावते. दिवाळीत हा खोरखधंदा जोमाने सुरू होतो. दिवाळीच्या सुरुवातीला एखादी छोटी कारवाई करून पुढे ‘गणित’ हा विभागाकडून सरळ करून घेतले जात असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT