Akola News: A team of 993 people will visit two lakh houses, leprosy and tuberculosis patients will be searched 
अकोला

993 जणांची टीम देणार दोन लाख घरांना भेट, कुष्ठ व क्षय रोग्यांचा घेतला जाणार शोध 

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : समाजातील क्षयरोग व कुष्ठ रोग ग्रस्तांचा शोध घेवून निदान निश्चिती करणे आवश्यक आहे. त्यासोबतच संबंधितांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम १ ते 16 १६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

त्याअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करुन रुग्णांचा शोध घेवून सदर मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

कुष्ठ व क्षयरोग ग्रस्तांचा शोध घेण्यासंदर्भात मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा शुक्रवारी (ता. २७) नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजश्री देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, जिल्हा प्रसिध्दी व माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा -  राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

२ लाख घरांना भेटी; आरोग्याची तपासणी
कुष्ठरोग व क्षयरोग्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील २ लाख १९ हजार ६८६ घरांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यासाठी ९९३ चमू तयार करण्यात आल्या असून त्या १ ते १६ डिसेंबर या कालावधीत भेट देणार आहे. सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहेत. एकूण १४ दिवसांच्या कालावधीत दररोज एका चमूंमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केल्यानंतर घराच्या दरवाजावर खून करण्यात येणार आहे.

हेही वाचा -  पावसाचा इशारा अन् थंडीची लाट

थूंकीचे नमूने घेणार
मोहिमेदरम्यान क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थूंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास छातीचे एक्सरे काढण्यात येणार आहे. तसेच कुष्ठरोगाचे लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. पथनाटय, पोस्टर्स, बॅनर्स व ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT