akola news Vaccination will be slowed down! Only 3,680 doses of vaccine received 
अकोला

लसीकरणाचा वेग मंदावणार!, लसींचे केवळ ३ हजार ६८० डोज प्राप्त

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे आरोग्य विभागाच्या अकोला मंडळासाठी १६ हजार डोज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अकोला जिल्ह्याला को-व्हॅक्सीनचे ३ हजार ६०५ डोज मिळाले आहेत. सदर डोजचा साठा अल्प असून त्याचा उपयोग दुसऱ्या डोजसाठीच करण्यात येणार असल्याने जिल्ह्याचा कोरोना लसीकरणाचा वेग मंदावणार आहे.

१६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रांमध्ये ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात येत होते. त्यासोबतच १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसींचा अल्प साठा शिल्लक आहे.
------------
आज पुरेल इतकाच साठा
कोरोना लसींचे जिल्ह्यात बुधवार (ता. ७) पर्यंत १२ हजार ६०० डोज शिल्लक होते. त्यापैकी गुरुवारी (ता. ८) साधारणतः ७ हजार डोजचा उपयोग झाला. त्यामुळे उर्वरित डोजमधून केवळ शुक्रवारी (ता. ९) लसीकरण करण्यात येईल, इतकाच साठा आरोग्य विभागाकडे शिल्लक आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT