Akola Nurses strike Warning sakal
अकोला

अकोला : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिचारिका आक्रमक

२० जूनपासून बेमुदत संपाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिकांचा विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे गत सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात कार्यालयाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने परिचारिकांनी पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

गत १० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील परिचारिकांची पदोन्नती प्रलंबित आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या नर्सेस संघटनेच्यावतीने बेमुदत संपाचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद धरणे आंदोलन केले होते.

सदर आंदोलनाची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी दिले होते. मात्र यावर सहा महिने उलटले त्यानंतर सुद्धा पदोन्नतीसह अनेक मागण्यांपैकी एकही मागणी मंजूर झाली नाही.

त्यामुळे याबाबत तोडगा काढावा अन्यथा येणाऱ्या दिवसांत संघटना आक्रमक होऊन आंदोलन करेल असे निवेदन नर्सेस संघटनांनी पालकमंत्री यांना दिले आहे. यावेळी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा संगीता जाधव, सल्लागार समितीच्या विजयकर, दुर्गा पवार, खवले, सुनीता वानखडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT