ग्रामदैवत  sakal
अकोला

Akola : पार्श्वनाथाचे मंदिर खुले व्हावे

चार दशकांपासून ग्रामदैवत बंदिस्त

गजानन देशमुख

शिरपूर : जैन धर्मीयांची काशी शिरपूर जैन येथील ग्रामदैवत भगवान पार्श्वनाथाचे अधांतरी मूर्ती असलेले पुरातन मंदिर, बंदिस्त असलेले ग्रामदैवत खुले व्हावे, अशी जनभावना आहे. शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथाला शिरपूरवासी ग्रामदैवत समजतात. येथील मंदिरात भगवान पार्श्वनाथाची मूर्ती प्राचीन व अधांतरी आहे. हे मंदिर १९८१ पासून दिगंबर व श्वेतांबर या दोन पंथांच्या अंतर्गत वादामुळे, तब्बल चार दशकांपासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकले आहे. त्यामुळे मंदिर सीलबंद अवस्थेत पडलेले आहे. साहजिकच मंदिर सीलबंद असल्यामुळे मंदिर भग्नावस्थेकडे जात आहे व हजारो वर्षे प्राचीन असलेली वास्तू नामशेष होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

संबंध देशभरातून येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. आजही जे श्रद्धाळू याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात, त्यांना छोट्याशा झरोक्यामधून मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. मंदिराची ही अवस्था बघून भाविक उद्विग्न होऊन जातात. चार दशकांपासून चालू असलेल्या न्यायालयीन वादामुळे भाविकांची हतबलता प्रकर्षाने दिसून येते.

चार महिन्यांपूर्वी जैन धर्मियांचे संतश्रेष्ठ आचार्य विद्यासागर महाराज यांचा चातुर्मास शिरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाले होते. महाराजांच्या प्रेरणेने व वास्तव्याने दोन्ही पंथीयांचा समन्वय घडून येईल व भगवान पार्श्वनाथाचे द्वार भाविकभक्तांच्या दर्शनासाठी खुले होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र तसे झाले नाही. मंदिराचा न्यायालयीन वाद मिटून मंदिर खुले झाले, तरच या तीर्थक्षेत्राचा ब दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे शक्य आहे.

येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इमदाद यांनी न्यायालयामध्ये जनहित याचिका आता पुन्हा नव्याने दाखल केली आहे. सदर याचिका सध्या न्यायप्रविष्ट आहे. विकासाची अंमलबजावणी, रखडलेला मास्टर प्लॅन व पार्श्वनाथाचे बंद असलेले मंदिर हे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत या प्राचीन तीर्थक्षेत्राचा विकास होणे कठीणच असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. एकूणच पार्श्वनाथाच्या मंदिराची चाबी हीच येथील तीर्थक्षेत्राच्या विकासाची चाबी असल्याचे दिसून येते.

दोन्ही पंथाच्या सामंजस्याच्या भूमिकेतून चार दशकांपासून बंदिस्त असलेले भगवान पार्श्वनाथाचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खुले व्हावे. हीच सर्व शिरपूरवासियांची अपेक्षा आहे. प्रसंगी बेमुदत उपोषण करण्याचा मी विचार करीत आहे.

- विनायकराव देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय नेहरू ब्रिगेड दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT