Akola Sakal
अकोला

Akola Agriculture News : शेतकऱ्यांभोवती विषबाधेचा फास, आतापर्यंत सात शेतकऱ्यांना विषबाधा; काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

प्रत्येक वर्षी जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. त्यानुसाय या खरीप हंगामात आतापर्यंत फवारणीतून सात शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

अकोला - कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. फवारणीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील सात शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली असून संबंधितांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली असून ते सामान्य जीवन जगत आहेत. असे असले तरी शेतांमध्ये प्रत्यक्ष कीटकनाशक फवारणी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अधिक प्रमाणात करण्यात येईल, त्यामुळे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे.

सन् २०१८ मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतमजूर तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली हाेती. त्यावेळी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचे सर्वात जास्त बळी गेले हाेते.

अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते.

प्रत्येक वर्षी जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. त्यानुसाय या खरीप हंगामात आतापर्यंत फवारणीतून सात शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे.

संबंधित सर्व शेतकऱ्यांची प्रकृती उत्तम असली तरी फवारणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर मात्र विषबाधेचे प्रकार सुद्धा वाढू शकतात. त्यामुळे कृषी विभागामार्फत आतापासून उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत आज बैठक

जिल्ह्यात विषबाधा प्रकरणी जनजागृती करण्यासाठी शासनाने नोडल कंपनी म्हणून एफएमसी इंडीया प्रा.लि. या कीटकनाशक कंपनीची नियुक्ती केली आहे.

या हंगामात किटकनाशक हाताळताना विषबाधा होणार नाही यासाठी सर्व संबंधितांना सुचित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता व्हीसीद्वारे ऑनलाईन सभा होणार आहे. त्यामध्ये विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात येईल.

गत वर्षी ७८ शेतकऱ्यांना विषबाधा

गत वर्षी जिल्ह्यात एकूण ७८ शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आहे. या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्व संंबंधित उपचारनंतर बरे झाले, परंतु विषबाधा होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने यंदा असे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT