Akola Police Action against illegal sand dealer sakal
अकोला

अकोला : अवैध 'वाळू उपसा' करणाऱ्यांवर कारवाई

महसूल व पोलिस विभागाने सात ट्रॅक्टर वाहनांना नदीपात्रात पकडून वाहनावर कारवाई केली

सकाळ वृत्तसेवा

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील पूर्णा नदिपात्रातील हाता वाळू घाटातून अवैध वाळूचा उपसा व वाळूची वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टर वाहनांना नदीपात्रात पकडून वाहनावर कारवाई केली. ही कारवाई महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी पहाटे केली.

तेल्हारा तालुक्यातील लिलाव झालेल्या वाळू घाटाच्या राॅयल्टीवर पूर्णा नदीपात्रातील लिलाव न झालेल्या वाळू घाटातून सर्रास वाळू चोरी सुरू होती. याबाबत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार सैय्यद एहसानोद्दीन यांनी सतर्क नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्याकरिता महसूल विभागाच्या पथकाला तत्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले.

उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकारही पोलिस ताफ्यासह नदीपात्रात दाखल झाले. नदीपात्रात सात ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आले. सातही ट्रॅक्टरांना उरळ पोलिस स्टेशनला जमा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पूर्णा व मन नदीपात्रातील लिलाव न झालेल्या घाटातून सर्रास वाळूची चोरी सुरू असून, महसूल व पोलिस विभागाने या घाटातील वाळू चोरावरही संयुक्त कारवाईची मागणी होत आहे. हाता येथील धडक कारवाईमुळे वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. या संयुक्त कारवाईत तलाठी म्हस्के, कांताराम तांबडे, श्री. हरीहर, एएसआय बचे, श्री. सपकाळ, श्री बाभुळकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT