Edible Oil Import Duty Cut
esakal
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने देशांतर्गत बाजारातही महागाईचा दबाव वाढला आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रमुख कच्च्या खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क (BCD) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या आयातीचा खर्च कमी होण्यास मदत होऊन त्याचा फायदा ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे.