akola rain update rainfall beneficial for kharif crop farmer agriculture sakal
अकोला

Akola Rain News : पावसाच्या आगमनाने पिकांना मिळाली नवसंजीवनी

शेतकऱ्यांत समाधानाचे पिके बहरली ः खरीप हंगाम हातून जाण्याची होती शक्यता

सकाळ वृत्तसेवा

उंबर्डा बाजार : मागील तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न आल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने सर्व पिकांना संजीवनी मिळाली आहे. कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

यावर्षी सातत्याने दीड महिना हजेरी लावलेल्या पावसाने मागील तीन आठवडा विश्रांती घेतली होती. सोयाबीन, मूग, उडीद, पिकासह अन्य पिके फुलासह पोषक अवस्थेत असताना कडक उन्हामुळे सोयाबीन पिकांना पाण्याची नितांत गरज होती.

पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. असतांना उंबर्डा बाजार परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या होत्या. मात्र उशीरा का होईना ६ सप्टेंबरला मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला आणि शेतकरी सुखावला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. परिसरातील सर्व पिके बहरू लागली आहेत.

केवळ पावसाअभावी वाया जाणारी पिके आता समाधानकारक दिसत असल्याने आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले आहेत.सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन समस्या निकाली काढली होती;

पण सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पाण्याचा तीन आठवड्याचा खंड पाहून चिंतीत झाले होते. माथ्यावर जमीन असल्याने परिसरात पाण्याची नितांत गरज होती. ती गरज बुधवारी आलेल्या जोरदार पावसाने पूर्ण केली. यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातात आला आहे.

पूढे पिके घरी येईपर्यंत काय होणार, हे सांगता येत नसले तरी या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापुढे पावसाने अधून -मधून हजेरी लावली तर अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट भरून निघू शकते, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

मालेगाव : यावेळी तब्बल एक महिना उशिराने मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले.त्यानंतर जुलै महिन्यात पावसात सातत्य राखले गेल्याने पीकाची वाढ जोमाने समाधानकारक झाली.परंतु ऐन फुलं आणि शेंगा धरण्याच्या काळात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या झोपा मोडल्या होत्या.कडक उन पडून हलक्या जमिनीत पीकं दुपारच्या वेळी माना टाकू लागली होती.

हाती आलेलं पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना.बुधवारी दुपारुन पावसानं जोरदार कमबॅक केल्याने सुकत चाललेल्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झालं आहे. सोयाबिनला ऐन फुलं, आणि शेंगा धरण्याच्या काळात पावसाने जवळपास पंधरा दिवसापासून दडी मारली होती.

कडक उन्हामुळे सोयाबीनच्या कळ्या गळून पडू लागल्या होत्या. उत्पादनात मोठी घट होण्याच्या शक्यता वाढली होती. परंतु बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात पडलेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीन,तूर पिकाला मोठा आधार मिळाला असला तरी; आणखी या महिन्यात दोन, चार दिवसाची विश्रांती घेवून एव्हढा महिना पावसात सातत्याची आवश्यकता आहे.त्यामुळे अजूनही शंभर टक्के खरिप पीक घरात येईल याची खात्री देता येत नाही. अजुनही संकटं पूर्णपणे टळल नाही. फक्त खरीप पिकांला संजीवनी मिळाली आहे.

वाशीम रिसोड तालुक्यात सर्वाधिक नुकसान

गेल्या विस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आधीच कमी पाऊस असलेल्या वाशीम व रिसोड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीन ऐन फुल अवस्थेत असतांना पावसाने दडी मारल्याने या दोन तालुक्यात फुलगळ होवून झाडांना शेंगा धरल्या नाहीत शासनाने याबाबत मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT