Rajendra Patni
Rajendra Patni sakal
अकोला

Akola : आ. राजेंद्र पाटणी यांच्या पाठपुराव्यास शासन दरबारी यश

सकाळ वृत्तसेवा

कारंजा : गत जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासन दरबारी केलेला पाठपुरावा आज फळास आला. जिल्ह्यातील १५ लाख ६८ हजार ५३ शेतकऱ्यांना तब्बल १९५ कोटी ४७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश शासनाने निर्गमित केला आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे.

गत गत जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. शेतातील पिके जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले होते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले होते.

प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठविला खरा परंतु प्रशासनाचा अहवाल उशिरा पोहोचल्यामुळे पहिल्या शासन निर्णयात वाशीम जिल्ह्यातील नुकसानीचा समावेश होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुन्हा आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. या सर्व बाबींची दखल घेऊन शासनाने आज जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ८५३ शेतकऱ्यांना तब्बल १९५ कोटी ४७ लाख रूपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

वाढीव दराने नुकसान भरपाई

शासनाने आज जाहीर केलेली नुकसान भरपाई ही वाढीव दराने आहे. पूर्वीनुकसानीची मर्यादा केवळ २ हेक्टर पर्यंत होती. ती आता ३ हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली असून कोरडवाहू पिकांच्या नुकसानीची भरपाई प्रति हेक्टरी ६८०० वरून १३६०० करण्यात आलेली आहे. बागायत पिकांची नुकसान भरपाई १३५०० वरून २७००० तर बहुवार्षिक पिकांची नुकसान भरपाई १८००० वरून ३६००० करण्यात आलेली आहे. या वाढीव दरानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

जिल्हाभरातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हमखास नुकसान भरपाई मिळेल असे आपण यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार आज शासनाने वाढीव मर्यादा व दराने ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जाहीर केली आहे.

- आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष भाजपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT