Akola Rice supply from Gondia to ration shops
Akola Rice supply from Gondia to ration shops sakal
अकोला

अकोला : लाभार्थ्यांसाठी गोंदियातून तांदूळ पुरवठा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात तांदुळाचा अल्प साठा शिल्लक असल्याने रेशन दुकानातून गरिबांना तांदुळाचे वाटप करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील शासकीय गोदामातून तांदुळाची उचल करण्यात येत आहे. तांदुळाची ही उचल नोव्हेंबर महिन्यापर्यंत कायम ठेवण्याचे आदेश शासनाने पुरवठा विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले असतानाच तांदुळाची उचल गोंदिया येथू होत असल्याने शासनाला मात्र धान्य वाहतुकीचा फटका बसत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातील हजाराे गाेरगरिबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लाेकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते.

पुरवठा विभागाला सदर धान्याचा साठा भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) मार्फत उपलब्ध करुन देण्यात येतो, तर धान्याची साठवणूक केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वखार महामंडळाचे गोदाम आहेत. त्यामधून पुरवठा विभागाला रेशनच्या धान्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यानुसार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे असलेल्या वखारच्या गोदामातून पुरवठा विभागाला गहू व तांदुळ उपलब्ध करून देण्यात येतो. परंतु गत काही दिवसांपासून या ठिकाणी तांदुळाचा साठा अल्प उपलब्ध असल्याने शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार पुरवठा अधिकारी कार्यालय गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून तांदुळाची उचल करत आहे. त्यामुळे धान्य वाहतुकीचा फटका शासनाला बसत आहे.

धान्याची दररोज वाहतूक

सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखत ते पात्र लाभार्थींपर्यंत थेट पोहचावे, यासाठी अन्न सुरक्षा कायद्यात द्वारपोच धान्य वाहतूक योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतूदींतर्गंत रेशन दुकानदारांना वेळेत धान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही वाहतूक ठेकेदार व पुरवठा विभागावर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्याचा वेळेत पुरवठा व्हावा यासाठी दररोज गोंदिया येथून ट्रकच्या माध्यमातून दररोज शेकडो क्विंटल तांदुळ प्रत्येक तालुक्यातील गोदामात तर महानगरात थेट रेशन दुकानातून करण्यात येत आहे.

असा लागतो लाभार्थ्यांना तांदुळ

  • अंत्योदय गटातील लाभार्थ्यांसाठी ८९५ मेट्रीक टन, प्राध्यान्य गटातील लाभार्थ्यांसाठी ३ हजार ३१४ मेट्रीक टन तांदुळाचे नियतन शासनाने मंजूर केले आहे. सदर तांदुळाची उचल आमगाव (गोंदिया) येथून करण्यात येत आहे.

  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय कार्डधारकांना ७७२ मेट्रीक टन व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ३ हजार ३१५ मेट्रीक टन तांदुळाचे नियतन शासनाने मंजूर केले आहे. त्याची उचल आमगाव (गोंदिया) येथून करण्यात येत आहे.

स्थानिक वखार महामंडळाच्या गोदामात मोजकाच तांदुळ उपलब्ध आहे. त्यामुळे अंत्योदय, प्राधान्य गटातील नियमित व पीएम गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गोंदिया येथून तांदुळाची उचल करण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांसाठी मात्र स्थानिक वखारच्या गोदामातीलच तांदुळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT