Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Virat Kohli : आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी खुपच खराब राहिली होती, पण विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
Virat Kohli
Virat Kohlisakal

Virat Kohli : आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी खुपच खराब राहिली होती, पण विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आरसीबी सध्या पॉइंट टेबलमध्ये दहाव्या स्थानावर आहे. पण प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत आणि याचे श्रेय देखील विराट कोहलीच्या फलंदाजीला जाते. आरसीबीसाठी विराट कोहली जितका वेळ मैदानावर आहे तितकाच वेळ मैदानाबाहेर घालवत आहे.

Virat Kohli
MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

अलीकडेच, विराट कोहलीसह इतर काही सहकाऱ्यांनी एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये हजेरी लावली जिथे त्याने अनेक मनोरंजक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान होस्ट गौरव कपूरने विराट कोहलीला विचारले की, जर तु क्रिकेटर नसता तर काय करत असता? या प्रश्नाला उत्तर देताना विराट कोहलीने मोठे वक्तव्य केले.

Virat Kohli
घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

या व्हायरल क्लिपमध्ये कोहली म्हणतो की, 'मला माहित नाही, पण कदाचित बिजनेस करत असतो. आणि खरे सांगायचे झाले तर, मी याबद्दल कधीही विचार केला नाही. कारण मला बिजनेस करता येत नाही. आता हळूहळू येतो. जर मी क्रिकेटशिवाय बिजनेस केला असता तर 200% लोकांनी मला मूर्ख बनवले असते. आधी खूप फसवणूक झाली मात्र आता सगळं शिकलो आहे.

Virat Kohli
MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

कोहलीने अनेक कंपन्यांमध्ये केली गुंतवणूक

विराट कोहली अनेक बिजनेस चालवतो आणि त्याने इतरांच्या बिजनेसमध्येही गुंतवणूक केली आहे. कोहलीची 'wrogn' नावाची स्वतःची कपड्यांची कंपनी आहे. कोहली वन एट (18) नावाची रेस्टॉरंट चेनही चालवतो. या चेनमध्ये दिल्लीपासून मुंबईपर्यंत विराटचे रेस्टॉरंट्स आहेत. 2015 मध्ये, कोहलीने जिम आणि फिटनेस सेंटर कंपनी Chisel Fitness आणि CSE सोबत भागीदारी केली.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने गेल्या वर्षी देसी कॉफी ब्रँड Rage Coffee मध्ये गुंतवणूक केली होती. हा दिल्ली-आधारित FMCG ब्रँड 2018 मध्ये लॉन्च झाला होता. 2019 मध्ये, विराट कोहलीने बेंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी Galactus Funware Technology Pvt Ltd मध्ये गुंतवणूक केली होती. ही कंपनी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीग (MPL) चालवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com