Akola Risod Fata National Highway
Akola Risod Fata National Highway 
अकोला

अकाेला : रिसोड फाट्यानजीक नॅशनल हायवेवर तलावसदृश्य स्थिती

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर - एम एच ४६१ बी या मालेगाव शिरपूरमार्गे रिसोडकडे जाणाऱ्या नॅशनल हायवेवर स्थानिक रिसोड फाट्यानजीक वळण रस्त्यावर तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने सदर ठिकाण हे अपघात प्रवण झाले आहे. एम एच ४६१ बी या मालेगाव शिरपूरमार्गे रिसोडकडे जाणाऱ्या नॅशनल हायवेचे अंदाजे दोन वर्षापूर्वी काम पूर्णत्वास गेले आहे. मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक सुद्धा सुरू झाली आहे. रस्ता बांधकाम करतांना गावालगत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी नाली बांधकाम करणे आवश्यक होते.

अंदाजपत्रकामध्ये सदर काम समाविष्ट असतानासुद्धा, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक नाली बांधकाम केले नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या नियोजनाअभावी पाणी स्थानिक रिसोड फाट्यानजीक वळण रस्त्यावर स्थानिक रहिवासी गुलामभाई यांच्या घरासमोर तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहदारीस व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांचे दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत.

गावालगत नॅशनल हायवे रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकामाचे अंदाजपत्रक समाविष्ट असतांना नाली बांधकाम करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. परिणामी अनेक लोकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधित विभागाने तक्रारीची दखल घेतली नाही. सदर काम अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट असताना व कामासाठी शासनाचा निधी मंजूर असताना नाली बांधकाम विभागाकडून का टाळण्यात येत आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सदर ठिकाणी काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे सुद्धा बोलले जात आहे. नाली बांधकाम न करण्यामागे काही राजकीय षडयंत्र तर नाही ना? संबंधित यंत्रणेने नाली बांधकाम करण्याचे का थांबविले? असे अनेक प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने व स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा व गावालगत त्वरित नाली बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून पावसाच्या दिवसांमध्ये पाण्याची विल्हेवाट लागेल व नागरिकांना त्रास होणार नाही. अशी मागणी स्थानिक नागरिकांच्यावतीने होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT