akola esakal
अकोला

Shiv Bhojan Thali Yojana: जेवणाचा दर्जा खालावला; शिवभोजन केंद्राचे परवाने रद्द करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

अकोला: शहरातील कौलखेड येथील स्वाती सुरेशराव मांडवे यांच्या द्वारे संचालित आरव शिवभोजन केंद्रात भोजनाचा दर्जा कमी असल्याने सदर शिवभोजन केंद्राची परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ६ जून रोजी बजावले.

या शिवभोजन केंद्राची जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी पाहणी केली होती. त्यामध्ये गंभीर त्रुट्‍या आढळल्याने शिवभोजन केंद्र रद्द करण्यात आले आहे.

शहरातील कौलखेड येथे स्वाती सुरेशराव मांडवे यांना आरव शिवभोजन केंद्र चालवण्यात शासनाने मंजूरी दिली होती. या शिवभोजन केंद्राची २४ मे २०२३ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी आकस्मिक तपासणी केली.

तपासणी दरम्यान शिवभोजन केंद्रावर स्वयंपाक होत नसल्याचे दिसून आले. स्वच्छता दिसून आली नाही. वरण, पोळी, भाजी ची गुणवत्ता कमी दर्जाची व प्रमाणशिर दिसून आली नाही. सीसीटीव्ही बंद होते व मॉनिटर उपलब्ध नव्हते.

अन्न व औषधी विभागाचे प्रमाणपत्र दर्शनी भागावर आढळून आले नाही. शिवभोजन केंद्र शासन नियमानुसार वर्दळीच्या ठिकाणी दिसून आले नाही. त्यामुळे केंद्र संचालक स्वाती मांडवे यांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नोटीस बजावली होती.

नोटीसचे उत्तर देत स्वाती मांडवे हिने शिवभोजन केंद्र चालविणे शक्य नसल्याचे सांगत ते रद्द करण्याची विनंती केली होती. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव पुरवठा विभागाने तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असता जिल्हाधिकारी यांनी सदर केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश बजावले.

कौलखेड येथील आरव शिवभोजन केंद्रात भोजनचा दर्जा अतिशय खालावल्याचे दिसून आले. त्यासोबतच शिवभोजन केंद्रात इतरही त्रृट्‍या होत्या. त्यामुळे सदर केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला.

- बी.यू. काळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT