अकोला

अकोला: सहा खासगी हॉस्पिटल संचालकांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड

कोविड रुग्णांच्या उपचारात अनियमितता भोवली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविड हॉस्पिटल म्हणून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना अनियमितता होत असल्याने व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल अकोला येथील सहा हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिले. एका रुग्णालयाने रुग्णास जादा शुल्क आकारले म्हणून आकारलेले जादा शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत आदेशात देण्यात आलेली माहिती अशी की, येथील सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, आधार हॉस्पिटल नवीन बसस्टॅण्ड जवळ हार्मोनी हॉस्पिटल, माऊंट कारमेल शाळेजवळ, श्री गणेश हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक, डॉ. भिसे यांचा दवाखाना , जयहिंद चौक व बिहाडे हॉस्पिटल या ठिकाणी कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीने पाहणी व चौकशी केली. याठिकाणी प्रामुख्याने खालील अनियमितता दिसून आल्या.

आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशीराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे, चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनास न कळविणे, कोविड चाचणी निगेटिव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असतांना शासनाच्या रुग्णालयात वा कोविड रुग्णालयात संदर्भित करण्या ऐवजी नातेवाईकांच्या संमतिशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सुचनांप्रमाणे डीसीएच किंवा डिसीएचसी ला तात्काळ संदर्भित न करणे इ. तसेच बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचेही चौकशीत आढळल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड व बिहाडे हॉस्पिटलला रुग्णास जादा आकारलेली रक्कम परत करण्याचे आदेशीत केले आहे. तसेच याबाबतची अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT