Akola Start the closed passenger train MP Sanjay Dhotre sakal
अकोला

अकोला : बंद पॅसेंजर गाड्या कधी होणार सुरू?

खासदार संजय धोत्रे यांची भुसावळ मंडळाच्या व्यवस्थापकांकडे विचारणा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविड काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक नियमित झाले आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुरू करण्यात येतील, अशी विचारणा माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी भुसावळ मंडळाच्या व्यवस्थापकांडे केली आहे.

मध्ये रेल्वेच्या भुसावळ विभागातून नागपूर व वर्ध्यासाठी पॅसेंजर गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे विदर्भातील सर्वसामान्यांना प्रवासाची सुविधा मिळत होते. मात्र, कोविड काळात या गाड्या बंद कराव्या लागल्यात. आता हळूहळू रेल्वेने सर्वच गाड्या नियमित वेळापत्रकानुसार चालविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पॅसेंजर गाड्यांबाबत निर्णय घेण्यात आला नाही. पॅसेंजर गाड्या सुरू न झाल्यामुळे परिणामी इतर गाड्यांवर प्रवाशांची नाहक गर्दी होत आहे. व्यस्त असलेल्या मार्गावर पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवाशांना सुविधा देण्यात यावी,अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली आहे.

या गाड्यांची आहे प्रतीक्षा

  • गाडी क्रमांक ११३९४ ः वर्धा-भुसावळ

  • गाडी क्रमांक ११३९५ ः भुसावळ-वर्धा

  • गाडी क्रमांक ११३८५ ः नागपूर-भुसावळ

  • गाडी क्रमांक ११३८६ ः भुसावळ-नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT