sant tukdoji maharaj sakal
अकोला

Akola News: राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन जानेवारीत

राष्ट्रसंतांच्या ५४ व्या पुण्यस्मरणानिमित्त अकोला येथे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : क्रांतिदर्शी युगपुरूष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समग्र साहित्य शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या शुद्ध हेतूने गेले नऊ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ता. २० व २१ जानेवारी रोजी जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड अकोला येथे हे संमेलन होईल. (Akola News)

या संमेलनाची चर्चा विदर्भासह राज्यभरात होऊ लागल्याने दर्जासुध्दा वाढत आहे. हे संमेलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या गुणात्मक प्रचाराच्या दृष्टीने शिस्तबद्ध व चाकोरीबद्ध होण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग प्रामुख्याने नोंदवला जात असतो. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, उद्‍घाटक, स्वागताध्यक्ष, समारोपीय कार्यक्रमाचे पाहुणे, विविध परिसंवादाचे विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक, व्याख्याते, प्रवक्ते, पत्रकार, राष्ट्रीय कीर्तनकार, गायक, गझलकार सामूदायिक ध्यान, प्रार्थना साधक इत्यादी मान्यवरांच्या भरगच्च उपस्थिती लाभेल.

तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विज्ञानवादी व परिवर्तनशील विचारांनी हे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. त्याकरिता अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यातील श्रीगुरुदेव प्रेमींनी सहकार्य व सेवेकरिता आपापले नावे आयोजन समितीकडे नोंदवावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT