शिक्षक पतसंस्था Sakal
अकोला

अकोला : शिक्षक पतसंस्था निवडणुकीसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल

अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सोमवारी (ता. ६) ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सोमवारी (ता. ६) ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार (ता. ८) शेवटचा दिवस असल्याने पुढील दोन दिवस आणखी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक मार्च २०२० मध्ये हाेणे अपेक्षित हाेते. मात्र काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने निवडणूक लांबणीवर पडली हाेती. आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणुकीचा मार्ग माेकळा झाला असून, प्राथमिक मतदार यादीही प्रकाशित झाली आहे. त्यासोबतच उपनिबंधक सहकारी संस्थेमार्फत शिक्षक सहकारी पतसंस्थेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे.

त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी २ डिसेंबर रोजी सर्वसाधारण मतदार संघातून एक तर ३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी अनुसूचित जाती मतदारसंघासाठी एक अर्ज दाखल करण्यात आला. तर सोमवारी (ता. ६) ४३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आताएकूण अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या ४५ झाली आहे.

सोमवारी दाखल झालेले अर्ज

मतदारसंघाचे नाव अर्ज संख्या

सर्वसाधारण २३

इतर मागासवर्गीय ०४

अनुसूचित जाती-जमाती ०३

विशेष मागास प्रवर्ग ०५

महिला ०४

ठेविदार ०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT