Akola teraha chipi project road construction work delay sakal
अकोला

अकाेला : बाहेर गेलेल्या प्रकल्पांचे श्रेयही आमदारांनी घ्यावे!

रस्त्यांचा विकास खुंटला; भारत बटालियन प्रकल्पही पळविला

धर्मेश चौधरी

तेल्हारा : अकोला जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत सर्वात मागे असलेल्या तेल्हारा तालुक्यातील चिपी प्रकल्पाचे श्रेय लाटण्याची चढाओढ सध्या जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांमध्ये सुरू आहे. या प्रकल्पाची चर्चा सुरू असतानाच तालुक्यात मंजूर झालेली भारत बटालियन पळविण्यात आली. गेले चार वर्षांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्यांचा प्रकल्प मार्ग लागलेला नाही. या प्रकल्पाबाबत आमदार महोदय शब्दही काढायला तयार नाही. जसे कामाचे श्रेय घेता तसे आमदारांनी या तालुक्यातून पळविण्यात आलेल्या प्रकल्पांतील अपयशाचे श्रेयही घ्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

चिपी प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता मिळविण्यावरून भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात सध्या श्रेय घेण्याचा आटापिटा सुरू आहे. या लोकप्रतिनिधींना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्नावरही तेवढीच आत्मियता का दाखवू नये? वान धरणांमधील तेल्हारा तालुक्यांच्या हक्काचे पाणी अकोला महानगरपालिकेच्या अमृत योजनेकरिता आरक्षित करण्यात आले तेव्हा आमदार भारसाकळे व आमदार मिटकरी कुठे होते?बाळापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठ सुद्धा याच वान धरणातील पाणी आरक्षितकरण्यात आले.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथील भारत बटालियन कॅम्पसुद्धा या तालुक्यातून सर्वात आधी मंजूर झाला होता. हा प्रकल्प कोणी पळून नेला? आमदार या पळवापळवीचीही जबाबदारी घेणार आहेत का? तेल्हारा तालुक्यातील जनतेने वानचे पाणी वाचविण्यासाठी फार मोठा लढा दिला. भारत बटालियनसुद्धा तेल्हारा तालुक्यातून जाऊ नये म्हणून जनता रस्त्यावर उतली होती.

जन आंदोलन सुद्धा उभे झाले होते. तरीसुद्धा बटालियन कॅम्प जिल्ह्यातून पळविण्यात आला. तेल्हारा तालुक्यातील जनतेच्या हक्काचे पाणीसुद्धा आमदार वाचवू शकले नाही. गेले चार वर्षांपासून तेल्हारा शहरातून तालुक्याच्या चारही बाजूला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या जीवघेण्या रस्त्यांवर आतापर्यंत अनेकांनी प्राण गमाविले आहे. शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले. त्या ‘श्रेय’ कुणाला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

सक्षम नेतृत्वाचा अभाव

तेल्हारा तालुका हा अकोला जिल्हा मुख्यालयापासून सर्वाधिक अंतर असलेला व कायम दुर्लक्षित तालुका राहिला आहे. दळवळणाच्या साधणांचा अभाव असल्याने सुपीक असलेल्या तेल्हारा तालुक्याच्या विकासाचा आलेख कधीही उंचावला नाही. येथील अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून भिजत पडले आहेत. तालुक्यात सक्षम नेतृत्वच तयार झाले नाही. आयात नेत्यांच्या पाठीमागे पळण्याची शर्यत स्थानिक नेत्यांमध्ये लागलेली दिसते. त्यामुळे या तालुक्याचा विकास खुंटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT