Akola Tin shed built at Vaikunth Dham Cemetery 
अकोला

अकाेला : रुढी-परंपरेला फाटा देत तिकडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

तेरवी न करता वैकुंठ धाम येथे बांधले टिन शेड

साकळ वृत्तसेवा

हिवरखेड - मृत्यू हा अटळ असून, मृत्यू हेच अंतिम सत्य मानले जाते. हिंदू धर्मात मृत्यू पश्चातचा विधी अतिशय खर्चिक असून, या खर्चातून काहीच साध्य होत नाही, पण तरीही अनेक जण या खर्चिक वाटेनेच जाणे पसंत करतात, मात्र सुरवातीपासूनच पुरोगामी विचारांचे असलेल्या हिवरखेड येथील तिडके परिवाराने आपल्या आईच्या निधनानंतर तेरवी, गोड जेवण या कालबाह्य, खर्चिक प्रथेला तिलांजली देत आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ संत तुकाराम वैकुंठ धाम, कार्ला वेस स्मशानभूमी येथे टिन शेड उभारून अंत्ययात्रेत वा अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांसाठी ऊन, पाऊस इत्यादीपासून बचाव होण्यासाठी नवीन पायंडा पाडत समाजासमोर नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे.

हिवरखेड येथील माजी आमदार स्व.डॉ.का.शा. तिडके यांच्या पत्नी श्रीमती शशिकलाबाई तिडके यांचे ता.१९ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची उच्चशिक्षित मुले डॉ.राम तिडके, कृष्णा तिडके, गजानन तिडके, कैलास तिडके यांनी कुटुंबातील वडीलधारी मार्गदर्शक नंदू तिडके, रघुनाथ तिडके यांच्याशी चर्चा विनीमय करून तेरवी न करता स्मशानभूमीत लोकांची सोय व्हावी, गावकऱ्यांना जनसुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने टिन शेड बांधून दिले. टिन शेडचा स्मृतिअर्पण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

कार्यक्रमात संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीच्या वतीने उपसरपंच रमेश दुतोंडे, महेंद्र कराळे, विलास घुंगड, पोलिस पाटील प्रकाश गावंडे, अनिल भोपळे, महेंद्र भोपळे, मनिष गिर्हे, गोपाल गिर्हे, डॉ.प्रशांत इंगळे, तुलसीदास खिरोडकार, धिरज बजाज, प्रा.संतोषकुमार राऊत उपस्थित होते. तेरवी सारखा अनावश्यक खर्च टाळा, आदर्श विवाह करा, असे नेहमी आवाहन करणाऱ्या व समाज सुधारणेची कास धरणाऱ्या संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीने तिडके परिवाराच्या या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी रामेश्वर शिंगणे, संजय गिर्हे, निखील गिर्हे, सुरज चौबे, बाळासाहेब नेरकर, सतीश इंगळे, राजेश टाले, दिलीप बाळापुरे, सुभाष कसुरकार, केशवराव टोहरे, अरुण राहणे, मनिष गोरद, सोनाजी माहोकार, शालीग्राम मोरोकार, देविदास घुंगड, संतोष शिंगणे, लक्ष्मण धांडे, दिलीप धांडे, उमेश टापरे, रमेश कराळे, प्रकाश खोब्रागडे, गजानन राऊत, सुनील निंबोकार, गोपाल भोंगाळे, दीपक देशमुख, सारंगधर कौलकार, गजानन भटकर, रामदास गावंडे, रवी मानकर, दिनकर परनाटे, योगेश सोनोने, उमेश शेळके, सुनील तिडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कराळे, तर आभार उमेश तिडके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT