अकोला

Akola : भाऊसाहेबांच्या परंपरेनुसार चालण्याचे वचन देतो : हर्षवर्धन देशमुख

सिरसोली येथे सत्कार सोहळा

सकाळ डिजिटल टीम

सिरसोली : शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी ज्या मुख्य हेतूने श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली, तळागाळातील शेतकऱ्यांना या संस्थेचा लाभ व्हावा यासाठी दिवस-रात्र एक करून त्यांनी संस्था उभी केली, त्यांचा मुख्य हेतू हा तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे होता, त्यांची ही परंपरा मी व माझे सहकारी चालविणार असल्याचे आपणास वचन देत असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. ते येथे आयोजित सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव खोटरे होते, तर सत्कारमूर्ती म्हणून ॲड. गजाननराव पुंडकर, ॲड.जयवंत पुसदेकर, दिलीपराव इंगोले, हेमंत काळमेघ, प्रा.केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा.सुभाष बनसोड उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, सर्व आजीवन सदस्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यासाठी आम्ही कोणतेही मतभेद न ठेवता त्या पूर्ण पूर्णत्वास नेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू, आमच्या चुका लक्षात आणून द्या... त्या आम्ही सुधारू व पुन्हा होणार नाहीत याची काळजी निश्चित घेऊ, जो आपण आमच्या सर्व सहकार्यांवर विश्वास टाकला त्या विश्वासाला कोठेही तळा जाऊ देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक शशिधरराव खोटरे यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा खोटरे परिवार, आजीवन सदस्य नारायणराव देवतळे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी, तर आभार प्रा. मिलिंद खोटरे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT