damage bridge esakal
अकोला

Akola : जुन्या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक

पूल खचल्यास तेल्हारा-वरवट रस्त्याची वाहतूक पडू शकते बंद

सकाळ डिजिटल टीम

तेल्हारा : शहरातील तेल्हारा, वरवट, जळगाव या राज्यमार्ग वाहतुकीच्या रस्त्यावरील गौतमा नदीवरील पूल विटा-चुन्याचा बांधलेला असून, तो ५० वर्षे जुना आहे. हा पूल जीर्ण झाला असून, कोणत्याही क्षणी याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय असे घडल्यास तेल्हारा-वरवट-संग्रामपूर या गावाचा संपर्क तुटू शकतो व नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ निर्माण होऊ शकते.

शहरातून जाणारा वलगाव ते एदलाबाद हा जुना १९१ क्रमांकाचा व सध्याचा तेल्हारा-वरवट-जळगाव जामोद हा राज्य महामार्ग क्रमांक २७१ असून, नेमका हा मार्ग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते माळेगाव नाक्या पुढे मिसिंग रूट म्हणून आहे. याच दरम्यान शहरातील माध्यभागातून वाहणाऱ्या गौतमा नदीवर ५० वर्ष जुना विटा व चुन्याने बांधण्यात आलेला एक पूल आहे.

हा पूल शिकस्त झाला असून, याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर पूल हा मिसिंग रूटमध्ये येत असल्याने व पालिका हद्दीत येत आहे, त्यामुळे सदर पुलाची देखभाल, दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून करण्यात येते. या रस्त्याला असलेला पर्यायी मार्ग हा अरुंद असल्याने ॲटो व दुचाकीधारक या मार्गाचा रहदारीकरिता वापर करतात. परंतु, ट्रक, कंटेनर, हार्वेस्टर, एसटी बस सारखे जड वाहने नाईलाजाने याच पुलावरून वाहतूक करतात.

आधीच शिकस्त झालेला हा पूल या जड वाहतुकीमुळे कोसळू शकतो व एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. नुकतेच अकोट-अकोला मार्गावरील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली, त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. या घटनेपासून संबंधितांनी धडा घेत अपघातापूर्वी यावर उपाय योजना करण्याची गरज आहे.

स्थानिक प्रताप चौकात असलेला गौतमा नदीवरील पूल हा जुना असून, शिकस्त झाला आहे. या पुलावरून ट्रॅक्टरने शेतमाल विक्रीसाठी न्यावा लागतो, त्यामुळे रहदारी करताना मनात भीती असते. पूल कधी कोसळेल काही सांगता येत नाही. शासनाने लवकरच नवीन पूल बांधावा जेणेकरून भविष्यात दुर्घटना घडणार नाही.

- सुरज साळुंके, वाहनधारक, तेल्हारा

शहरातून वरवटकडे जाणाऱ्या मार्गावर प्रताप चौकात असलेला पूल हा विटा व चुन्याने बनलेला आहे. अतिशय जुना पूल असल्याने तो जीर्ण झाला आहे. माझ्याकडे दहाचाकी जड वाहने आहेत, जळगाव-संग्रामपूरकडे जायचे असल्यास या मार्गाव्यतिरिक्त मार्ग नसल्याने नाईलाजाने या पुलावरून जावे लागते. वाहन पूल ओलांडत असताना मनात पूल संपेपर्यंत भीती असते. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन नवीन पुलाची उभारणी करावी.

- मनिष फसाले, वाहनधारक, तेल्हारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT