Akola unique movement of self-respect by bathing a pair of oxen with milk, if not noticed, we will also stop food grains. 
अकोला

बैल जोडिला दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन, दखल न घेतल्यास अन्न धान्यही बंद करु 

गुलाबराव इंगळे

जळगाव  जामोद (जि.बुलडाणा) ः बैल जोडीची दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीने अनोखे आंदोलन केले आहे. सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार ठीक ठीकाणी कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. स्वाभिमानी युवाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात निरोड(बाजार)येथे ग्रामस्थांनी चक्क बैल जोडीला दुधाची आंघोळ घालुन शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.


सरकारने दुधाला प्रती लिटर 5 रुपये अनुदान द्या, दुध पावडरला प्रती किलोला 50 रुपये अनुदान द्यावे. व तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडुन करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी साहेब यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला दिला आहे.

या आंदोलनामधे स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर,जिल्हा सरचिटणीस रोशन देशमुख,शाम ठाकरे,वैभव मुरुख,गजानन सोळे,गणेश सांवत, शांताराम पाटील,ऊमेश सौदागर, अमोल आगरकर,जनार्दन परमाळे गणेश सौदागर गणेश वहीतकार,संजय सुरळकर,कीसन वसतकार, निलेश साबे,रामदास सुरळकार, ऋषिकेश देशमुख, सह बहुसंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.अनोख्याआंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वाभिमानाच्या ह्या दुग्ध अभिषक आंदोलनाची सर्वदूर चर्चा आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

Pune News : सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की? भेकराईनगर गोशाळा येथील प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT