लसीकरण  sakal
अकोला

अकोला : दिवाळीमुळे चार दिवस कोरोना लसीकरण बंद !

दिवाळीचा काळ बघता अकोला महानगरपालिका व जिल्ह्यातील कोरोना लसीकरण उद्यापासून (ता. ४) ता. ७ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : दिवाळीचा काळ बघता अकोला महानगरपालिका व जिल्ह्यातील कोरोना लसीकरण उद्यापासून (ता. ४) ता. ७ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. मनपा क्षेत्रात सध्या पहिला डोज घेतल्यानंतर दुसरा डोज घेण्यासाठी ३१ हजारांवर नागरिक प्रतीक्षेत आहेत.

मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी विडीओ कॉन्‍फरन्‍सव्‍दारे दिलेल्‍या सुचनेनुसार कोविड-१९ ची दिसरी लाट रोखण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पहिला डोजचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करावयाचे आहे. त्‍यानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना किमान पहिला डोज १०० टक्के देण्याचे नियोजन करण्यासाठी उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्‍य विभाग, सामान्‍य प्रशासन विभाग व शिक्षण विभागाची बैठक बुधवारी बोलावली होती.

बैठकीत आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला मनपा क्षेत्रामध्ये लसीचा दुसरा डोज न घेतलेले कोविशिल्‍डचे २१ हजार ७२३ व कोवॅक्‍सिनचे नऊ हजार १३३ नागरिक बाकी आहेत. ज्‍यांचा एकही डोज पूर्ण झालेला नाही अशा सर्व नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी व मृत्‍यूचे प्रमाण कमी करण्‍याकरिता हे लसीकरण होणे गरजेचे आहे.

याकरीता विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, शाळा मनपा अकोला शाळेतील सर्व कर्मचारी व त्‍यांचे कुटुंबीय, सर्व बचत गट, फेरीवाले, दिव्‍यांग यांचे लसीकरण झालेला किंवा नाही याबाबतचा माहिती संकलीत करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या. सर्व धर्मगुरू यांना जनतेला आवाहन करण्‍याविषयीचे पत्र अकोला मनपातर्फे देण्‍यात येईल. वैद्यकीय आरोग्‍य विभागातर्फे नागरिकांशी संपर्क करणे करीता कॉल सेंटर सुरू करण्‍यात येणार आहे. या बैठकीला आरोग्‍य विभागाचे डॉ.अस्मिता पाठक, डॉ. विजय चव्‍हाण, डॉ. अनुप चौधरी, सामान्‍य प्रशासन विभागाचे श्री. दिलीप जाधव, शिक्षण विभागाचे अनवर खान, मुळे उपस्थित होते.

सोमवारपासून सुरू होणार लसीकरण

दिवाळीच्या काळात ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यातील लसीकरण बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार, ता. ८ नोव्हेंबरपासून पुन्हा कोरोना लसीकरणाला सुरुवात होईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT