Monsoon Updates | Rain Updates in Maharashtra esakal
अकोला

अकोला : जिल्ह्यात आजपासून वादळी पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून संदेश प्राप्त

ओंकार जाधव

अकोला : भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार ता. १५ ते १९ दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

वीज वादळाची स्थिती जाणवताच टिव्ही, संगणक, इ. विद्युत उपकरणे स्त्रोतापासून (स्विचबोर्ड मधून) अलग करुन ठेवावीत. वीज वादळाच्या स्थितीत मोबाईल फोनचा वापर टाळावा. घरात वा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. खिडक्या दारे बंद करावीत. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वाहनावर प्रवास करीत असल्यास आपले वाहन विजेच्या खांबाजवळ थांबवू नये. वीज कोसळल्यास मानवी हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी लगेच हृदयाजवळील भागास मालिश करावे व तोंडाद्वारे श्वसन प्रक्रियेस मदत द्यावी, या कालावधीत सर्व यंत्रणांनी आपापल्या भागात दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT