
नागपुरात दिवसभराच्या विश्रांतीनंतर विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात झाली आहे. आज हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज नव्हता मात्र स्थानिक वातावरणामुळे पावसाच्या सरी असल्याचं बोललं जातं आहे. नागपुरात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सरीला सुरूवात झालीय. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानं उन्हामुळे उकाडा जाणवत होता, पण रात्रीच्या सुरू झालेल्या सरीने काहीसा दिलासा मिळाला.