Akola Washim Marathi News - Shiv Sena quarrel; MP lost his temper and MLA Rajendra Patni clashed! 
अकोला

भाजप-शिवसेनेत जोरदार राडा; खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आपसातच भिडले!

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना  गवळी  आणि  कारंजा  मतदार  संघाचे भाजपचे  आमदार राजेंद्र पाटणी  यांच्या  मधील राजकीय वैर तसं जूनेच.  

मात्र ,वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे आज (ता.26)  जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी  या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित  राहणार होते.  त्यापूर्वी  विकास कामात अडथला  निर्माण करून  शिवसेनेने  आणलेल्या  विकास  कामाला  बाधा  निर्माण का करता  म्हणत,  खासदार  भावना  गवळी आणि आमदार राजेंद्र  पाटणी  आमने सामने  आले  आणि  तू तू मै मै झाली.

या दरम्यान  शिविगाळ झाली.  तर शिवसेनेच्या   कार्यकर्ते  आमदार पाटणी  यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला.  आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची  तक्रार दाखल केली.  


यावर  राजेंद्र पाटणी यांना या विषयी विचारले असता त्यांनी सांगितलं की, मी कुठलाच वाद घातला नाही. तर शिवसेना खासदार भावना  गवळी यांना झालेल्या  प्रकारावर विचारले असता  नंतर बोलेल अस सांगून  बोलण्याच टाळले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप सेनेचे  कार्यकर्ते जमा झाल्या ने वाद उदभवणार हे लक्षात येताच पोलिसांनी बंदीबस्तात वाढ केली होती. या प्रकारानंतर भाजपच्या वतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT