akola washim news MGNREGA; Those who embezzled Rs 41 lakh are still at large 
अकोला

मनरेगा; ४१ लाखांचा अपहार करणारे अद्यापही मोकाटच

सकाळ वृत्तसेेवा

शिरपूर (जि.वाशीम)  ः मालेगाव तालुक्यातील कोठा ग्रा.पं.मधील मनरेगाच्या कामामध्ये ४१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षणातून उघड झाले होते. त्यानंतर दीड वर्षाचा काळ लोटला परंतु, अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कोणावरच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वैभव अवचार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

अकुशल मजुरांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे, गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावले जावे म्हणून, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने मनरेगा ही एक महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली. मात्र, काही भ्रष्ट अधिकारी व काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी ‘अर्ध्यात तुम्ही व अर्ध्यात आम्ही’ या तत्त्वाने ही योजना बदनाम केली आहे. मालेगाव तालुक्यामध्ये जवळपास शंभर कोटीच्यावर या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

सामाजिक अंकेक्षणात अनेक ग्रा.पं.चे ‘पराक्रम’ उघड झाले आहेत. काही ग्रा.पं. सध्या जात्यात आहेत तर, काही ग्रा.पं. सुपात आहेत. सामाजिक अंकेक्षणाचे अहवाल पुढील कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचून दीड वर्षाचा काळ लोटला आहे. कोठा येथील मनरेगाच्या कामात सुमारे ४१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षण अहवालातून उघड झाले होते.

त्यामुळे उपोषणकर्ते वैभव सुभाष अवचार व इतर तक्रारदारांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या व निवेदने देऊन दोषींवर कारवाई करण्याची वारंवार मागणी केली होती. या प्रकरणी दीड वर्षात कारवाई झाली नाही.

उलट दोषींना पडद्या आडून अभय दिले गेले. म्हणून, तक्रारदार वैभव अवचार व इतरांनी निवेदन देऊन दोषींवर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाला जाग आला नाही. त्यामुळे वैभव अवचार यांनी ९ एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कारवाईकडे सर्वांचे लक्ष
१ एप्रिल रोजी तक्रारदार वैभव अवचार यांना दोषींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. वैभव अवचार यांनी शिरपूर पो.स्टे.ला त्या संदर्भात तक्रार सुद्धा दिली होती. त्यामुळे कोठा मनरेगा अपहार प्रकरणातील दोषींविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. आता तर, तक्रारदारांनी अपहार प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी बेमुदत उपोषण छेडले आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(संपादन - वि्वेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT