akola washim news Two on a two-wheeler killed in a horrific accident 
अकोला

भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम ः वाशीम ते हिंगोली महामार्गावरील विठ्ठल कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ दुचाकीला ट्रेलरने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.१२) रात्री दरम्यान घडली.

सूत्रांकडून माहितीनुसार, वाशीम येथील राहुल सुधाकर बानकर (वय २०) व फिरदौस अ. कयूम (वय १९) हे दोघे हिंगोलीकडून वाशीमकडे येत असताना आरजे-०२-जीबी-५६२७ क्रमाकांच्या ट्रेलरने एमएच-३७-एक्स-३८७५ या क्रमाकांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातात राहुल बानकर व फिरदोस कयूम हे दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवून अपघातग्रस्त वाहन जमा घेतले. याप्रकरणी ट्रेेलर चाकलाविरुद्ध भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 Tax Reform : या तारखेपासून नवा आयकर कायदा लागू! आयकर रिटर्न ची तारीख वाढविली, जाणून घ्या काय बदललं

Latest Marathi News Union Budget 2026 Live : अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही

Union Budget 2026 : अपघात विम्याच्या व्याजावर कोणताही कर नाही ! अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी 'सी-मार्ट' योजना; लखपती दीदींनंतर महिलांच्या उद्योजकतेला मिळणार नवा आधार!

Union Budget 2026: 'युवा शक्ती प्रेरित बजेट’ मधील महत्वाच्या घोषणा आणि ठळक मुद्दे, जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT