Akola Weather Update
Akola Weather Update Sakal
अकोला

Akola Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग; शुक्रवारी ४४ तर, शनिवारी ४३ अंश सेल्सिअसची नोंद

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जगातील सर्वोष्ण शहरांच्या यादीत नोंद असलेल्या अकोल्यात यावर्षी देखील सूर्य फणफणत आहे. १९ एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअसची तर, शनिवारी देखील ४३ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

उष्णतेची लाट अजूनही तिव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून अकोल्यात तापमानाचा जोर वाढत असून, शुक्रवारी (ता.१९) कमाल ४४ अंश सेल्सिसची नोंद झाली. उन्हाची तडाखा आणि उष्णतेच्या झळा अजूनही तिव्र होणार असून, पुढील दोन ते तीन दिवस अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे लवकरच पारा ४५ अंशापार जाण्याची शक्यता आहे.

यावर्षी अवकाळी पावसाच्या हजेरीसह मार्चच्या सुरुवातीलाच अचानक तापमान वाढीचा जोरही दिसून आला. अकोल्यात तडफदार उन्हाळा अनुभवायला येत असून, दिवसभर उष्ण झळा आणि गर्मीने अकोलेकर चिंब होत आहेत. किमान तापमानातही वाढ झाली असून, रात्री उशिरापर्यंत उष्णतेची झळ अकोलेकरांना सोसावी लागत आहे.

अशी घ्यावी काळजी

पातळ, सच्छिद्र, सुती कपडे वापरावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी वापरावी. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हाळ्यात काम करताना डोक्यावर टोपी, रूमाल, दुपट्टा वापरावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास लिंबूपाणी, ताक, सरबत, ओआरएस आदींचा नियमित वापर करावा.

अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी लक्षणे व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशुधन व पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कामाच्या ठिकाणी थंड पेयजलाची व्यवस्था असावी. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

‘हे’ टाळा अन् राहा सुरक्षित

लहान मुलांना दार बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दु. १२.३० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कापड घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे व स्वयंपाकघराची दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक, मद्यसेवन टाळावे. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT