akola weather news Heat waves throughout the week; The temperature will cross 45 degrees Celsius  
अकोला

अकोला विदर्भात ‘हॉट’, आठवडाभरात उष्णतेची लाट; पारा जाणार ४५ अंशसेल्सिअस पार

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्ह्यात सध्या तापमान वाढत असून, बुधवारी विदर्भात सर्वाधिक ४२.९ अंशसेल्सिअसची नोंद अकोल्यात झाली. यापुढे जिल्ह्यात तापमानाचा आलेख चढत जाणार असून, आठवडाभरात उष्णतेची लाट अकोलेकरांना अनुभवायला येऊ शकते.

जगातील उष्ण शहरांमध्ये आता अकोल्याची गणती होत असून, गेल्या दोन वर्षांत जागातील सर्वोष्ण शहराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा अकोला जिल्ह्याची नोंद झाली होती. जिल्ह्यात दिवसेंदिवस व दरवर्षी उष्णतेचा आलेख वाढतच असून, त्यासाठी विविध कारणे तज्ज्ञांकडून दिली जातात.

मात्र, वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड ही दोन मुख्य कारणे सर्वश्रूत आहेत. कोविड-१९ चा प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गेल्यावर्षी भारतासह जगामध्ये विविध देशात लॉकडाउन करण्यात आल्याने जागतिक प्रदूषणात बऱ्यापैकी घट झाली होती. परंतु, २०२० मध्ये पुन्हा प्रदूषणात वाढ झाली आहे.

त्यामुळे यावर्षी तापमानाचा जोर कितपत राहील हे सांगता येणे कठीण आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, सध्या अकोल्यासह विदर्भात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. बुधवारी (ता.७) सुद्धा विदर्भामध्ये सर्वाधिक अकोल्यात ४२.९ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, आठवडाभरात तापमानाचा आलेख वाढून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

विदर्भात प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात दरवर्षी तापमान अधिक राहाते. सध्याही विदर्भात सरासरी तापमान ४१ अंशसेल्सिअसहून अधिक आहे. पुढील दिवसात त्यामध्ये वाढ होणार आहे. आठडाभरात उष्णतेची लाट विदर्भात जाणवू शकते. सध्या पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT