Akola Weather Update  sakal
अकोला

Akola Weather Update : अकोला शहराचा पारा ३६ अंशावर; उकाड्याने नागरिक घामाघूम, सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

बदलत्या वातावरणामुळे यंदा सप्टेंबरच्या शेवटीच ऑक्टोबर हीटचे चटके बसत आहेत. सोमवारी (ता.२३) अकोला शहरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवस सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वत्र उकाडा निर्माण झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे यंदा सप्टेंबरच्या शेवटीच ऑक्टोबर हीटचे चटके बसत आहेत. सोमवारी (ता.२३) अकोला शहरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसभर ऊन तापल्याने नागरिक घामाघूम झाले होते.

जिल्ह्यात गत दोन दिवस पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमान थोडे नियंत्रणात आल्यासारखे वाटत असताना सोमवारपासून उन्हाचा तडाखा सुरू झाला. कडक उन्हाचे चटके शहरवासीयांना बसत आहेत. साधारणपणे सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस होऊन गेल्यावर शहरात ऑक्टोबर हिट जाणवत असते.

त्यावेळी तापमान ३६ अंशांच्या आसपास जाते. पण, सप्टेंबर महिन्यातच तापमानाने ऑक्टोबर हिटची पातळी गाठण्याकडे वाटचाल केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कडक ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. गेल्या आठवड्यातही तीन ते चार दिवस तापमानामुळे उन्हाचे चटके बसत होते. दोन दिवसांपूर्वीच शहरात चांगला पाऊस होऊनही उकाडा कायम आहे.

रुग्णांमध्ये वाढ

ऑक्टोबर हिट हा वातावरणातील बदल प्रत्येक वर्षी येताना रोगांना निमंत्रण देतो. यंदा सप्टेंबरच्या शेवटीच तापमानात वाढ झाल्याने व्हायरलच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण सप्टेंबर महिन्यात ऑगस्टच्या तुलनेत अधिक झाले आहेत. आता उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.

उन्हाच्या या अचानक होणाऱ्या माऱ्याचा सामना करण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण घटल्याने चक्कर अथवा थकवा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

काय घ्यावी काळजी?

या आठवड्यात परतीचा पाऊस जोरदार बरसणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. पावसामुळे हवेत येणारा गारवा कमी होत ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढत जाणार आहे. वातावरणातील या बदलाचा आरोग्यावर थेट परिणाम होतो.

त्यामुळे अचानक तापमान वाढल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. अशावेळी ताजी फळे, पालेभाज्यांचा वापर आहारात करावा. गरम व जड अन्न पदार्थ टाळावेत. कारण त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. गाजर, काकडी, कांदा शरीराला थंडावा देतात. जेवणात गरम मसाले, तिखटाचा वापर कमी केला पाहीजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT